अनुभवले मी परिपूर्ण आरोग्य!

 

 

शिर्डीच्या श्रीसाईबाबांचा भक्त असलेला मी चार वर्षापूर्वी माझ्या एकुलत्या एक मुलाच्या "सोहम्"च्या निमित्ताने ब्रह्मर्षी पत्रिजींचे आनापानसति पिरामिड ध्यान करायला लागल्या पासून मला एकदाही डॉक्टरांकडे औषधासाठी जावे लागले नाही.

 

हा अनुभव मी सर्वाना ध्यान वर्गात सांगत असे. सहा महिन्यापूर्वी रात्री आंबेगाव पठारमध्ये ध्यान वर्ग घेवून आह्मी परत येत असताना प्रचंड पावसात चिम्ब भिजलो. या वर्षातील पुण्यातील जास्तीत जास्त जोरात पडणार्‍या पावसाचा तो पाऊस उच्चांक होता.

 

दुसर्‍या दिवशी मी खूप आजारी पडलो..चार दिवस झाले तरी ताप, अस्वस्थता कमी होत नव्हती, इच्छा नसतानाही घरच्यांच्या दबावाने कसाबसा डॉक्टरांकडे गेलो. पण त्यांच्या औषधोपचारानेही फरक पडला नाही. कुटुंबियांच्या व मित्रांच्या आग्रहाने इतर बाहेरचे उपायही झाले. पण आराम पडेना. मनात विचारच येत नाही या जाणिवेने अस्वस्थ झालो. मला तर वेड लागलय कां अशी भिती वाटू लागली. आपल्या मुलाचे, कुटुंबाचे मग काय होईल या कल्पनेने रडू आवरत नव्हते. माझी ही दयनीय स्थिती पाहून संत ज्ञानेश्वर पिरामिड ध्यान केंद्राच्या पिरामिड मास्टरनी ब्रह्मर्षी पत्रिजींशी संपर्क साधला. सरांनी मला फोनवर सांगितले "डरो मत जो भी तुह्मे तकलीफ हो रही है वह कल खतम होगी. ध्यानमे बैठो. जो कुछ हो रहा है उसका कारण और सोल्युशन तुह्मे अपने आप पता चलेगा."

 

पण मी इतक्या विचित्र मनस्थितीत होतो कि तीन दिवस झाले तरी ध्यान करू शकलो नाही. चौथ्या दिवशी रात्री कसाबसा ध्यान करायला बसलो. मला जाणवले कि मी एकदम खोल खड्‍यात पडलो आहे. माझ मन आधीच विचार शून्य झाले आहे. अचानक आतून आवाज आला. "तुझी काही कर्म आहेत. तुझ्या मनात कोणांबद्दल क्रोध, घ्रृणा साठवून ठेवली आहेत ते आठव. आणी त्यांची माफी मागून बिनशर्थ प्रेम ठेव." त्याप्रमाणे मी एकेक करून तीन जणाची माफी मागून, बिनशर्थ प्रेम पाठविले. आणी काय आश्चर्य त्याक्षणी माझ्या शरीराला होणारा त्रास पूर्णपणे थांबला. माझे शरीर अगदी हलके झाले व मन प्रसन्न झालं. आनंदाच्या धारा माझ्यातून वाहू लागल्या मी खू्पच आनंदी झालो. खर्‍या अर्थाने संपूर्ण आरोग्याचा अनुभव मला आला.

 

संदिप ओंकार
९८२२६३३३६२

Go to top