ध्यान - ज्ञानोदय - जागरूकता - जीवन उत्साह

(MEDITATION-ENLIGHTENMENT-AWARENESS-LIFE-ZEST)

(M-E-A-L)

 

आपण सर्व देव आहोत हा सिध्दांत आहे. तथापि आपण प्रत्यक्ष जीवनात-व्यवहारात देव व्हायला हवे. आपण आपल्या विचारात, बोलण्यात आणि आचरणात देवत्वाचा सराव करायला हवा.

 

अध्यात्म शास्त्र व ध्यान यांचा आपला सराव जसजसा वाढेल तितके आपण आपल्या देवपणात जास्त निपुण होऊ. आपल्या देवपणात आपण आणखी जास्त प्रवीण होत गेल्यावर, आपला जीवन उत्साह वाढतो !

 

आध्यात्मिकतेचे मूळ ध्येय आहे, आपला जीवन उत्साह वाढविणे !

 

ध्यान - पहिला टप्पा

 

ध्यान म्हणजे मनावर ताबा मिळविणे, मनाचे स्वामी होणे.
ध्यानाच्या तीन बाजू :

 

आनापानसति
कायानुपासना
आणि विपश्यना

 

आनापानसतिचा अर्थ आहे नेहमीच्या, नैसर्गिक साध्या, हळुवार, सोप्या व नाजूक श्वासाबरोबर रहाणे.

 

कायानुपासना (नाडीमंडल शुध्दी): आनापानसतिचा सराव केल्यानंतर शरीरातील ऊर्जा क्षेत्रातील जाणवणाऱ्या सूक्ष्म हालचालींवर लक्ष ठेवणे.

 

विपश्यना : आनापानसति सराव केल्यानंतर तिसरा डोळा उघडायला लागल्यावर येणाऱ्या दिव्यचक्षू अनुभवांकडे खूप लक्ष देणे.

 

आत्मज्ञान प्राप्ति ज्ञानोदय- दुसरा टप्पा

 

आनापानसति ध्यानाचा सतत सराव करीत राहिल्यावर आपण विपश्यना अवस्थेत प्रवेश करतो. आपला तिसरा डोळा जागृत होतो. आपल्याला तृतीय नेत्र / दिव्यचक्षू असून आपण आत्मा आहोत हे जाणतो. याला आत्मज्ञान-ज्ञानोदय म्हणतात !

 

आत्मज्ञान वाढवित गेल्यावर आपला आपल्या मनावरील ताबा वाढत जातो. या दररोजच्या ऐहिक जगात आपण बनतो योग्य बुध्दिमत्ता असलेली व्यक्ति !

 

ध्यानाचा पहिला टप्पा आपल्याला दुसऱ्या टप्प्याकडे म्हणजेच आत्मज्ञानाकडे-ज्ञानप्राप्तीकडे घेऊन जातो. तरीपण आत्मज्ञान प्राप्ती दृढ होण्यासाठी आणखी दोन आवश्यक क्रिया करायला हव्यात.

 

स्वाध्याय आणि सज्जन सांगत्य

 

स्वाध्याय म्हणजे योग्य पुस्तके वाचणे व सज्जन सांगत्य म्हणजे चांगल्या-योग्य लोकांबरोबर विचारांची देवाण घेवाण करणे, पूर्ण वठणीवर आणलेले चांगले मनच या गोष्टी करू शकेल.

 

योग्य पुस्तके वाचल्याशिवाय आणि योग्य लोकांच्या सहवासात राहिल्याशिवाय आत्मज्ञान परिपक्व होत नाही.

 

ज्ञानोदयाचा पुढचा अर्थ म्हणजे आणखी दोन गोष्टी :

 

कशाबद्दलही शोक न करणे
वेळ वाया न दवडणे

 

कोणतीही परिस्थिती असो किंवा आपण थोडेसेच यश मिळवू शकलो अथवा अपयशी ठरलो तरी शोक करण्यासाठी आपण या पृथ्वीवर आलेलो नाही. आपण येथे आलो आहोत ते सतत मजा करण्यासाठी व आनंदोत्सव साजरा करण्यासाठी !

 

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. हे लक्षात आल्यावर सतत मौजमजा करणे आपोआप घडते !

 

प्रत्येक पश्चाताप ही नवी घोडचूक असते ! आपण चुका करू, चुका होणे साहजिक आहे, पण त्याबद्दल दीर्घकाल पश्चाताप करत बसू नये.

 

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक क्षण नवनिर्माण व उत्पादकतेसाठी वापरायला हवा !

 

जागरूकता - तिसरा टप्पा

 

कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही परिस्थितीत फक्त आत्मज्ञानी लोकच जागरूक असू शकतात !


तेथे आणि तेव्हा वरून, येथे आणि आता वर परत येणे म्हणजे जागरूकपणा !

 

जागरूकता मिळवतांना गुरूंचा निकट सहवास अतिशय महत्वपूर्ण ठरतो.


गुरू हा जागरूकतेचा उत्तम नमुना-कळस आहे !

 

जागरूकतेला दोन आवश्यक बाजू आहेत.

 

1. प्रत्येक क्षणात जगणे.
2. अनंत काळात जगणे.

 

जागरूकता म्हणजे कोणत्याही क्षणी-प्रत्येक क्षणाला आपल्या हातातील कामात स्वतःला पूर्णपणे बुडवून घेणे-समर्पित करणे.

 

जागरूकतेचा अर्थ आहे चालू-सद्य परिस्थितीत पूर्णपणे जागरूक असणे.

 

जागरूकपणा म्हणजे महान अशा येथे व आता मध्ये नैसर्गिक भावनांबरोबर सुखाने वहात जाणे.

 

जागरूकतेचा असाही अर्थ आहे की सनातनतेच्या कल्पनेत जगणे. तेथे भूतकाळ आहे, तेथे वर्तमान आहे आणि तेथे भविष्यही आहे. तथापि हे दोन्ही स्पष्ट आणि वेगळे टप्पे- वेगवेगळया गोष्टी नाहीत तर ते आहे एक सततचे-निरंतर अस्तित्व !

 

विवेकी जीवन, अगदी नजिकचा भूतकाळ व नजिकचा भविष्यकाळ विचारात घेऊन वर्तमानकाळातील सर्वात योग्य क्रियेची किंवा निष्णात प्रतिक्रियेची हक्काने मागणी करते.

 

विवेकी जीवन अशी सुध्दा हक्काने मागणी करते की सनातन, शाश्वत भूतकाळ व शाश्वत भविष्यकाळ विचारात घेऊन वर्तमानकाळातील क्रिया-कृती करावी किंवा पूर्ण प्रतिक्रिया द्यावी.

 

जीवन उत्साह - शेवटचा टप्पा

 

ध्यानाचा शेवटचा टप्पा आहे आत्मज्ञान.
आत्मज्ञानाची शेवटची पायरी आहे जागरूकता.
जागरूकतेची शेवटची पायरी आहे जीवन उत्साह !

 

आता, प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला जातो ! आता, प्रत्येक परिस्थितीचा आस्वाद घेतला जातो ! आता, जीवन अत्यंत गतिमान होते ! आता, जीवन खरोखर आश्चर्यकारक-चमत्कारयुक्त होते !

 

आता, प्रत्येक विचाराला शक्ति प्राप्त होते ! विचार निर्माण होताच तो लगेच तसाच्या तसा काहीही कमतरता न रहाता प्रकट होतो, प्रत्यक्षात येतो !

 

आता, प्रत्येक शब्द स्फोटक बनतो ! आता, प्रत्येक कृती कलेचा व सौंदर्याचा नमुना होते !


आता, आयुष्य हे सतत साजरा होणारा उत्सव बनते !

 

जीवन चैतन्येला दोन आवश्यक बाजू असतात :

 

देणे
आणि 
घेणे

 

जास्त जीवन उत्साह म्हणजे जास्त करूणा... याचाच अर्थ जास्त आणखी जास्त देणे ! सतत देत जगणे ही नैसर्गिक-सहज सवय होते !

 

अधिक जीवन उत्साह म्हणजे अधिक आणि अधिक प्रत्येक गोष्ट स्वीकारणे ! सततचा स्वीकार ही सहज सवय होते !

 

देणे शोभादायक असते आणि घेणे डौलात असते... सतत, सर्व प्रकारच्या परिस्थितीत !

 

येथे देणे व घेणे अत्यंत उच्चप्रमाणात उच्चस्तरावर असते. असे जीवन गतिमान व उत्साही असते.

Go to top