" गृहस्थाश्रमात राहूनसुध्दा अध्यात्म प्रगती साधता येऊ शकते " 

 

माझे नाव पदमा नरेंद्र हिरास्कर, राहणार पुणे. माझे वय ४१ वर्षे असून मी गेल्या तीन वर्षापासून आनापानसति ध्यान करत आहे. ध्यानामुळे मला प्रसन्न वाटते. शरीर नेहमी निरोगी राहते. अध्यात्माची ओढ लहानपणा पासूनच होती. शाळेत ५ वीत असतांनाच अमरावतीचे मौनी दादाजी महाराज यांचा सहवास लाभला. कॉलेज जीवनापासून श्रीसाईमय झाले होते. विवाह झाल्यावर काही वर्षांनी माझा गायत्री परिवाराशी परिचय झाला. त्यात मी सक्रिय सहभागी आहे. लहानपणी भक्तीमार्ग, तरुणपणी कर्मयोग व आता ज्ञानमार्गावर वाटचाल सुरु आहे.

 

मी कोण आहे? आत्मा काय आहे? परमात्मा काय आहे? मोह माया काय आहे? ह्यातून कसे बाहेर पडायचे? पण गृहस्थ जीवन सोडून अध्यात्मात कसे जायचे असे अगणित प्रश्न माझ्या मनामध्ये येत असत. पण या सर्व प्रश्नांची उत्तरे मला आनापानसति ध्यानामुळे मिळाली. “घरमे ही घाट !” गृहस्थाश्रमात राहूनसुध्दा अध्यात्म प्रगती साधता येऊ शकते, हे समजले.

 

ब्रह्मर्षि पत्रीजींच्या पुण्यातील बर्‍याचश्या ध्यानकार्यशाळांमध्ये मी सहभागी झालेली आहे. पण भगवान नित्यांनंद पिरामिड ध्यान केंद्राच्या पिरामिड उदघाटन सोहळयादिवशी झालेल्या प्रवचनात पत्रीजींनी सांगितलेल्या पाच बोटांवरील विवरण, संन्यास न घेता गृहस्थाश्रमात राहून अध्यात्मात प्रगती कशी करावी याचा बोध झाला. ते पाच प्रकार खालील प्रमाणे आहेत.

 

१. साधू बना : म्हणजे शुध्द सात्विक आहार घ्या. मांसाहार करु नका.
२. मौनी बना : म्हणजे मौन पाळा. व्यर्थ गोष्टी बोलू नका. कुणाची निंदा करु नका.
३. ध्यानी बना : म्हणजे श्वासावर ध्यान केंद्रित करा. वासना टाळा, संयमित रहा. रिकाम्यावेळी इतर विचार करण्यापेक्षा आनापानसति ध्यान करा.
४. योगी बना : मी शरीर नाही आत्मा आहे या भावात रहा.
५. संत बना : आनंदी रहा. मी परमात्मा आहे या भावात रहा. सर्वांना आनंद द्या. आनंद पसरवा म्हणजे आनापानसति ध्यान शिकवा.

 

प्रत्येकी ४०-४० दिवस वरील पाच गोष्टींचा व आनापानसति ध्यानाचा अभ्यास करा. म्हणजे २०० दिवसात आपण परमात्मा बनू शकतो.

 

मधुमेहामुळे १५ वर्षे घ्यावे लागणारे इंश्युलिन आनापानसति ध्यानाने बंद झाल्यावर श्री. चंद्रकांत गानला यांनी त्यांच्या घराच्या गच्चीवर १२’ x १२’ पिरामिड बांधून सर्वांना ध्यानासाठी उपलब्ध करुन दिला आहे. तेथे मी नियमित ध्यान करत आहे. पौर्णिमेच्या दिवशी नेहमी न चुकता या भगवान नित्यानंद पिरामिड ध्यान केंद्रात जाऊन ध्यान करते. ध्यान अंधश्रध्दा नसून हे एक विज्ञान आहे. आनापानसति पिरामिड ध्यानात आपण शरीर, मन, बुध्दीच्या पलिकडे जाऊन आत्म्याला आणि परम्यात्माला अनुभवतो. त्यासाठी पिरामिड ऊर्जेचा खूप उपयोग होतो.
जय पिरामिड ध्यान जगत !

 

 

सौ. पदमा नरेंद्र हिरास्कर
फोन नं. ०२०-२६३६१७९३

Go to top