" मला खूप आनंद झाला "

 

माझे नाव सौ. शशिकला अशोक करे, राहणार पुणे. तीन वर्षापूर्वी माझे बायपास ऑपरेशन झाले. पायाचे पण ऑपरेशन करुन तिथली नस बायपाससाठी वापरल्यामुळे दोन्ही पायामध्ये दहा इंच लांब जखम झाली होती. त्यावेळी माझ्या शरीरावर औषधाचा खूप मारा झाला होता. दररोज तेरा गोळया खात होते. त्याच्या साईड इफेक्टमुळे माझ्या स्मरणशक्तिवर परिणाम झाला होता. मी कोणाला नीट ओळखूही शकत नव्हते. काय बोलते, कोणाशी बोलते काही काहीच समजत नव्हते.

 

असेच दोन ते तीन महिने गेले पायाचे ड्रेसिंग करून सुद्धा जखम भरत नव्हती. म्हणून परत पायाचे ऑपरेशन करावे लागले. त्यामुळे माझ्या शरिराचे फारच हाल होत होते. जुन्या औषधांबरोबर आणखी काही नवीन औषधे सुरु झाली. अशक्तपणा खूप होता. अक्षरश: मी माझ्या जीवनाला कंटाळून गेले होते.

 

ह्या दोन तीन महिन्यामध्ये ध्यान करायचेही थांबले होते. काहीच सुचत नव्हते. मनात विचार आला कि सगळया गोळया बंद करून बघावे. लगेच गोळया बंद केल्या. बसताही येत नव्हते तेव्हा झोपूनच ध्यान सुरु केले. दोन रात्र पूर्ण वेळ ध्यान केले. ध्यान केल्यानंतर थोडे बरे वाटू लागले. डोळे पूर्णपणे उघडले गेले. आणि मला हरवलेला सूर सापडला होता. ध्यान सुरुच ठेवले. ताजेतवाने वाटू लागले.

 

एक आठवडयानंतर चेकअपसाठी डॉक्टरांकडे गेले तेव्हा ते म्हणाले आता तुम्ही फ्रेश वाटता. मला खूप आनंद झाला. माझे चेकअप करून डॉक्टरांनी माझ्या एकदम दहा गोळया कमी केल्या.

 

आता केवळ तीन गोळया घेते. नित्यनेमाने दर रोज दीड तास ध्यान चालू आहे व मला खात्री आहे की बाकीच्या गोळयापण लवकरच बंद होतील. ही सगळी ब्रह्मर्षि पत्रीजींनी शिकविलेल्या आनापानसति पिरामिड ध्यानाचीच किमया आहे.

 

माझे त्यांना शतश: धन्यवाद !

 

सौ. शशिकला अशोक करे
पुणे

(मो. ८८८८०२५३९२, ९०११६६८६२९)

Go to top