" स्वास्थ्या संदर्भात माझे बरेच अनुभव आहेत "

 

ध्यानामध्ये आल्याने सर्वात पहिले माझे लाईफ स्टाईल चेंज झाले. आधी रात्री उशीरापर्यंत टि.व्ही. बघत असायचो, ज्यामुळे उशीरा झोप लागायची. अर्थातच त्यामुळे सकाळी उठण्यास उशीर व्हायचा ज्यामुळे पोट साफ होत नव्हते, पित्ताचा त्रास होत असे. आता मात्र ध्यानासाठी पहाटे लवकर उठतो त्यामुळे रात्री लवकर आणि अतिशय शांत व गाढ झोप लागते. साहजिकच त्यामुळे पोट साफ होणे, पित्ताची समस्या आपोआपच गेली, मान आणि पाठ दुखी बर्‍यापैकी कमी झाली.

 

माझ्या ध्यानमहाचक्रातील एक अनुभ्व तुम्हाला सांगावासा वाटतो. डिसेंबर महिन्यात २१ ते ३१ तारखेपर्यंत हा कार्यक्रम होता. तेथे संपूर्ण भारतातून मास्टर्स येणार होते. त्यांच्याबरोबर ध्यान केल्याने तुमच्या विचारात प्रगल्भता येऊ शकते, असे कळले म्हणून मी त्या कायक्रमास गेलो होतो.

 

तेथे सकाळी ५ ते ७ असे समूहध्यान होते. मी सकाळी ध्यानास बसलो. पत्रीजी सर स्वतः बासरी वाजवत होते, तसेच तबला, वीणा आणि व्हायोलिनचे अप्रतिम संगित तेथे होते. प्रचंड प्रमाणात वैश्विक ऊर्जा जाणवत होती.

 

तेथे बसल्यावर मला असे जाणवले किंवा स्पष्ट दिसले की माझ्या डोक्यातून ऊर्जेचा थेंब माझ्या हृदयात पडला. ज्याप्रमाणे पाणी भरलेल्या भांडयामध्ये वरून पाण्याचा थेंब टाकल्यावर पाण्याचे तरंग भांडयाच्या शेवटपर्यंत जाणवतात अगदी तशाच प्रमाणे मला ऊर्जेचा थेंब माझ्या हृदयात पडल्यावर, त्याचे तरंग शरीराच्या प्रत्येक टोकापर्यंत पोहचल्याचे जाणवले. हे तरंग जाणवल्याचा आनंद इतका उच्च कोटीचा होता की बस्स..........

 

माझे मन आता तयार झाले आहे की येणार्‍या कुठल्याही समस्येला तोंड देण्यासाठी मी सदैव तयार असतो. मी नेहमी प्रसन्न असल्याने माझी दररोजची कामे चांगली व लवकर होतात. त्यामुळे माझ्याकडे काही वेळ शिल्लक राहतो त्यात मी ध्यानासंबंधीची कामे करत असतो. कुणाला ध्यान शिकायचे असेल तर त्यांनी मला संपर्क करावा. माझा नंबर खाली देत आहे.

 


सिध्दार्थ बंडू रेळेकर
मो. ९३७२०७२३८४

Go to top