" बी.पी. ची गोळी बंद झाली "

 

ऑक्टोबर २०११ मध्ये माझे डाव्या हाताचे मनगट खूप दुखत होते. आजूबाजूच्या भागावर सूजही बरीच आलेली होती. औषधे, मलम यांच्या वापराने तात्पुरते बरे वाटायचे. पुढे दुखणे एवढे वाढले की डाव्या हाताची हालचाल करणेही कठिण झाले होते. ऑपरेशन शिवाय पर्याय नाही असे वाटू लागले. मनाची तशी तयारी करत होतो.

 

एकेदिवशी पुणे पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीचे शशिकांत जोशी माझ्या घरी आले होते. त्यांनी आनापानसति पिरामिड ध्यान माझ्या कुटुंबियांसमवेत माझ्याकडून करवून घेतले. आश्चर्य म्हणजे ध्यानानंतर लगेचच मला खूप बरे वाटले. वेदना कमी झाल्याचे लक्षात आले. डाव्या हाताची हालचाल थोडीफार करता येऊ लागली. ३-४ दिवस नियमित भरपूर ध्यान केल्यावर माझा हात ९०% बरा झाला.

 

ऑक्टोबर २००८ मध्ये पुण्यात झालेल्या ब्रह्मर्षि पत्रीजींच्या ध्यान शिबिरास मी नाशिकहून सहकुटुंब आलो होतो. आम्हाला सगळयांनाच ध्यान आवडले. त्यांचे पुण्यातील कार्यक्रम सहसा चुकवित नाही पण एम.एस.ई.बी. च्या ऑफिसमधील जबाबदार्‍या, युनियनचे काम, गेली २१ वर्षे नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीचा संस्थापक सेक्रेटरी या नात्याने निस्तरावे लागणारे वाढते व्याप इत्यादींमुळे ध्यान करू शकलो नाही. परंतू आता नियमित ध्यान व ध्यानप्रचार करतो आहे. गेल्या सहा महिन्यात नाशिकमध्ये पिरामिड मास्टर शशिकांत जोशी यांचे ५० ध्यानवर्गाचे आयोजन केले. रिक्षावाले, भाजीवाले, शेतकरी, विद्यार्थी, एम.एस.ई.बी., कलेक्टर कचेरी व बँका येथील स्टाफ व ऑफिसर्स, जेष्ठ नागरीक संघ, महिला गट, सी.ए., वकिल, डॉक्टर, इंजिनीयर, आमदार, खासदार व मंत्री असे अनेक लोक ध्यानाचा लाभ घेत आहेत. ध्यानातून आम्हाला झालेले फायदे व ध्यानप्रचारातून मिळणारा आनंद सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी लवकरच नाशिकमध्ये नियमित ध्यानकेंद्र सुरू करणे व मोठा पिरामिड बांधण्याचे प्रयत्‍नहि चालू आहेत.

 

माझी सौभाग्यवती सरोज, मुलगी अपर्णा बंगलोरच्या ध्यानयज्ञात डिसेंबर २००८ मध्ये सहभागी झाल्या होत्या. तेव्हा पासून सौ. सरोज नियमित सातत्याने ध्यान करते. तिची बी.पी. ची गोळी बंद झाली आहे. चोख काम करण्याच्या मूळ स्वभावाबरोबरच ध्यानामुळे मिळणारा आत्मविश्वास , शांत व ताणतणावरहित मनाची अवस्था यामुळे मागच्या वर्षी मिळालेली बँक ऑफ महाराष्ट्रमधील मॅनेजरपदाची जबाबदारीही ती सहज पार पाडते आहे. ध्यानाचे कार्यक्रम आमच्या घरी व इतर ठिकाणी आयोजित करण्यात तिचा मोलाचा वाटा असतो.

 

मुलगी अपर्णा आय. टी. कंपनीत चांगल्या पदावर काम करते आहे. तेथील तणावग्रस्त वातावरणावर कॅबने कामावर जाताना व येताना ध्यान करून ती मात करते आहे. आपल्या सहकार्‍यांना, परिचितांना ध्यानाबद्दल सांगते आहे.

 

मुलगा प्रशांत इंजिनियरींगचा विद्यार्थी आहे. मध्यंतरी कमी झालेला त्याचा आत्मविश्वास ध्यानाने वाढला असून अस्वस्थता जाऊन एकाग्रताही वाढत आहे. ध्यान प्रचाराच्या कार्यात त्याच्या मित्रांसोबत तो सहभागी होत असतो.


श्री. विलास देवळे,
 पुणे

मो. ९४२२२६६१३३

Go to top