" ताणतणावातून मुक्तता "

 

माझे अहमदनगरमधे एम.जी. रोडवर मदुरा स्टोअर्स हे तयार कपडयांचे दुकान आहे. शिक्षण बी.कॉम., एल.एल.बी., डी.एल.एल. असून नगरमधे गेली ३५ वर्षे हा व्यवसाय करीत आहे.

 

गेल्या पाच वर्षापासून माझे डोके खूप दुखत असे व मुख्य म्हणजे डोळ्यांवर प्रचंड ताण येत असे. मी शांतपणे झोपू शकत नव्हतो. दिवसभर मी जे काही केले ते व दिवसभर घडलेल्या घटना वेगवेगळया विचित्र विचारांबरोबर मला आठवत असत. बहुतेक वेळा हे विचार तणाव निर्माण करणारेच असत. गेली अनेक वर्षे रोज सकाळी लवकर उठून मी खेळायला व व्यायाम करायला जात असे. तरीही मला ताजेतवाने वाटत नसे. संपूर्ण दिवसात किमान एक तास चांगली झोप लागल्याशिवाय मला फ्रेश वाटत नसे. मी ऍलोपॅथी, होमियोपॅथी, आयुर्वेदिक औषधे घेतली. पण त्या सर्वांनी मला झोप येण्याचीच औषधे दिली. त्याचा मला उपयोग झाला नाही. मनःशांतीसाठी कोणतेही औषध नाही त्यावर ध्यान हाच एकमेव उपाय आहे याचा मला अनुभव आला.

 

ब्रह्मर्षी पत्री सरांच्या पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीचे श्री. जोशी व श्री. विजयकुमार यांची व माझी भेट झाली. त्यांनी पुण्याहून येऊन माझ्याकडून आनापानसति पिरामिड ध्यान करवून घेतले. ध्यान केल्यानंतर माझे डोळे दुखणे व डोळयांवरील ताण बराच कमी झाला. मी नियमित ध्यान करू लागलो. आता मी दिवसभर फ्रेश व उत्साही असतो. गेली दहा वर्षे मी माझी कार रात्री चालवत नसे. आता पूर्ण रात्रभरसुध्दा कार चालवू शकतो. माझा व्यवसाय व समाजकार्य यासाठी मी रोज १४ ते १६ तास उत्साहाने काम करत असतो.

 

ध्यान नियमित करू लागल्यापासून माझा चिडचिडा स्वभाव बदलला असून मी खूप शांत झालो आहे, असा अनुभव माझी पत्‍नी सौ. प्रिती सांगत असते. आता मी दुसर्‍यांना ध्यान शिकविण्यासाठी व ध्यानाचे वर्ग आयोजित करण्यासाठी पुष्कळ वेळ देत असतो. या कामात माझे मित्र व कुटुंबिय सुध्दा मला मदत करतात. लवकरच ध्यानासाठी पिरामिड बांधण्याचा विचार आहे.

 


किरण व्होरा
अहमदनगर

मो. ९८९०४१४८००

Go to top